विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सर्व शाळांना 4 दिवसांची सुट्टी जाहीर

School Holiday Update राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे आणि निवडणूक कामकाजासाठी शाळांना काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे.

यामुळे अनेक शाळांना सलग काही दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांच्या मनात “शाळा किती दिवस बंद राहणार?” आणि “पुन्हा शाळा कधी सुरू होईल?” असे प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग, शाळांना सुट्टी देण्यामागील कारण आणि संपूर्ण सुट्ट्यांची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

शाळांना सुट्टी का देण्यात आली?

राज्यात 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होत असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र सुरू केले गेले आहेत. मतदानाच्या दिवशी आणि त्याआधी मतदान साहित्याची वाटप प्रक्रिया, मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी या सर्व गोष्टींचे काम सुरू असते.

तसेच अनेक शिक्षक व सरकारी कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे शाळांचे नियमित कामकाज चालवणे कठीण होते. याच कारणामुळे शाळांना काही दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जातो.

हे पहिले का – मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म कसा भरावा 2026

शाळा किती दिवस बंद राहणार?

मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीपासून काही शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

14 जानेवारीला मकर संक्रांती असल्यामुळे पहिली सुट्टी
15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे सुट्टी
16 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया असल्यामुळे अनेक शाळांमध्ये कामकाज सुरू राहणार असल्याने सुट्टी जाहीर होण्याची शक्यता
17 जानेवारी शनिवार
18 जानेवारी रविवार

या सर्व कारणांमुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना सलग 5 दिवस सुट्टी मिळू शकते.

शाळा पुन्हा कधी सुरू होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा 14 जानेवारीपासून बंद राहिल्यास पुढील सोमवारी म्हणजेच 19 जानेवारीपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक प्रक्रियेतून शाळांची इमारत मोकळी झाल्यानंतरच नियमित वर्ग भरवणे शक्य होईल.

कोणत्या शहरांमध्ये सुट्टी असण्याची शक्यता?

15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात मतदान होत असल्यामुळे त्या भागातील अनेक शाळांमध्ये सुट्टी असू शकते. मतदान असलेल्या प्रमुख शहरांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

सर्व शाळांमध्ये सुट्टी एकसारखी लागू होईलच असे नाही. कारण काही शाळा मतदान केंद्र म्हणून वापरल्या जातात आणि काही शाळांमध्ये निवडणूक कामकाज नसते. त्यामुळे नेमकी सुट्टी किती दिवस आहे, हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या शाळेकडून आलेली नोटीस किंवा सूचना नक्की तपासावी.

Leave a Comment