मोठी बातमी! एकदाच पैसे भरा आणि दर महिन्याला 5,500 रुपये मिळवा

Post office monthly income : महिन्याच्या ठराविक तारखेला खात्यात पैसे जमा झाले की एक वेगळाच दिलासा मिळतो. जणू काही “पगार”च आला… पण प्रश्न असा की नोकरी नसताना किंवा रिटायरमेंटनंतर हा पगार येणार कसा?
आजकाल अनेकांचा हाच मोठा प्रश्न आहे. कारण शेअर बाजारात रोज चढ-उतार, एफडीवर कमी व्याज आणि महागाईचा दबाव यामुळे सुरक्षित पर्याय शोधणं कठीण झालं आहे.

पण जर तुम्हाला “जोखीम नको, पण दरमहा ठरलेलं पगार हवं” असेल, तर पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम म्हणजेच Post Office Monthly Income Scheme (MIS) हि योजना तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरू शकतो. ही सरकारी योजना असल्यामुळे पैसे सुरक्षित राहतात आणि महिन्यचा व्याज थेट खात्यात जमा होतं.

एका वेळची गुंतवणूक… आणि 5 वर्ष दरमहा फिक्स पैसे

या स्कीममध्ये तुम्हाला एकदाच एकरकमी रक्कम गुंतवायची असते. त्यानंतर पुढचे 5 वर्षे दर महिन्याला व्याजाचा पैसा तुमच्या खात्यात येतो. म्हणजे हातात नोकरी नसल्यानंतरही एक “फिक्स इनकम” सुरू राहते.

सध्या या योजनेवर 7.4 टक्के व्याजदर मिळतोय, जो अनेक मोठ्या बँकांच्या एफडीपेक्षा जास्त असल्यामुळे लोकांचा या योजनेकडे ओढा वाढतोय.

9 लाख गुंतवले तर दरमहा 5,550 रुपये कसे मिळतात?

समजा तुम्ही या योजनेत सिंगल अकाउंट (Single Account) उघडून 9 लाख रुपये गुंतवले.
तर 7.4 टक्के व्याजानुसार तुम्हाला वर्षाला 66,600 रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला 5,550 रुपये थेट खात्यात जमा होतात.

सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे 5 वर्षांची मुदत संपली की तुमचे 9 लाख रुपये मूळ पैसे जसेच्या तसे तुम्हाला परत मिळतात. म्हणजे तुम्ही व्याजही घेतलं आणि रक्कमही सुरक्षित ठेवली.

“माझ्याकडे 9 लाख नाहीत” तरी काळजी करू नका

खूप जणांना वाटतं की अशी योजना फक्त मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असेल. पण तसं नाही.
तुम्ही अगदी 1,000 रुपयांपासूनही सुरुवात करू शकता.

या योजनेत
एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतात
आणि पती-पत्नी जॉइंट अकाउंट उघडल्यास 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते

जॉइंट अकाउंटमध्ये गुंतवणूक वाढली की दरमहा मिळणारे व्याजही जास्त मिळते.

हे वाचा – दहावी-बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर ; कोणत्या दिवशी कुठला पेपर आत्ताच पाहून घ्या

ही योजना लोकांना “सुरक्षित” का वाटते?

कारण ही पूर्णपणे सरकारी योजना आहे. शेअर बाजारात काय चाललंय, डॉलर-रुपया काय झालं, त्याचा यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे पैसे बुडण्याची भीती नसते.

याशिवाय, भविष्यात गरज पडल्यास तुम्ही नॉमिनीही जोडू शकता. म्हणजे तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा हक्काचा पैसा योग्य व्यक्तीला मिळू शकतो.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा

या योजनेतून मिळणारे व्याज हे करपात्र असते. म्हणजे त्यावर टॅक्स लागू होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुमच्या एकूण उत्पन्नानुसार विचार करणे फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला जोखीम न घेता दरमहा फिक्स रक्कम हवी असेल, आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर पोस्ट ऑफिस MIS स्कीम हा पर्याय खूपच चांगला आहे. रिटायर लोक, गृहिणी किंवा सुरक्षित गुंतवणूक शोधणारे सामान्य नागरिक यांच्यासाठी ही योजना उपयोगाची ठरू शकते.

Leave a Comment