घरकुल यादी 2026 : तुमचेनाव यादीत आले का? असे चेक करा

PM Gharkul Yojana List Maharashtra 2026 प्रत्येक गरजू गरीब कुटुंबाचं स्वतःचं पक्कं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या महागाईत घर बांधणं अनेकांसाठी खूप कठीण होतं. जर तुम्ही अजूनही कच्च्या घरात राहत असाल किंवा भाड्याच्या घरात राहत असाल, तर केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिक PM Gharkul Yojana List Maharashtra 2026 ची वाट पाहत होते. काही लोकांनी अर्ज करूनही त्यांचं नाव यादीत येत नव्हतं, तर काही जणांचं घरकुल मंजूर होऊनही निधीअभावी प्रकरण अडकलेलं होतं. मात्र 2026 मध्ये घरकुल प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे नवीन अपडेटेड यादीत अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की घरकुल यादीमध्ये तुमचं नाव कसं तपासायचं, नवीन यादी कोणाला लागते आणि घरकुल मंजूर झाल्यावर पैसे कोणत्या पद्धतीने मिळतात.

PM Gharkul Yojana List 2026 Maharashtra

प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांमध्ये राबवली जाते. या योजनेचा उद्देश गरजू लोकांना पक्कं घर मिळवून देणे हा आहे.

योजनेचे नाव: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी)
राज्य: महाराष्ट्र
लाभार्थी वर्ष: 2025-2026 (New Updated List)
विभाग: ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार
आर्थिक मदत (अनुदान):
ग्रामीण: 1,20,000 रुपये
डोंगराळ भाग: 1,30,000 रुपये
(मनरेगा मजुरी आणि शौचालय अनुदान वेगळे)

उद्दिष्ट: संपूर्ण भारतात 3 कोटी नवीन घरे
अधिकृत वेबसाइट: pmayg.nic.in

हे वाचायचे राहिले – फ्री भांडे वाटप योजना : 5 मिनिटांत घरबसल्या मोबाईलवरून करा अर्ज..,

PMAY Gramin List 2026 मध्ये नाव कसे तपासायचे?

तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून तुमच्या गावाची PDF यादी डाउनलोड करून त्यामध्ये तुमचं नाव सहज पाहू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

Step 1: सर्वात आधी pmayg.nic.in या PMAY ग्रामीण अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Step 2: होम पेजवर Awaassoft हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
Step 3: त्यानंतर Report या ऑप्शनवर क्लिक करा.
Step 4: नवीन पेज ओपन झाल्यावर खाली स्क्रोल करा.
Step 5: H. Social Audit Reports या सेक्शनमध्ये जा.
Step 6: Beneficiary Details For Verification या लिंकवर क्लिक करा.
Step 7: फिल्टरमध्ये माहिती निवडा: State, District, Taluka, Village
Step 8: Year मध्ये 2025-26 निवडा
Step 9: योजना निवडा: Pradhan Mantri Awaas Yojana Gramin
Step 10: Captcha मध्ये विचारलेले गणित बरोबर टाका आणि Submit करा

Submit केल्यानंतर लगेच तुमच्या गावाची संपूर्ण यादी स्क्रीनवर ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि घर मंजुरीची स्थिती तपासू शकता.

घरकुल यादीत नाव नसेल तर काय करावे?

कधी-कधी अर्ज करूनही अनेक लोकांचं नाव यादीत येत नाही. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. कारण यावर उपाय आहेत.

सर्वात आधी तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जा आणि नोटीस बोर्डवर लावलेली Permanent Wait List (PWL) तपासा. जर तुम्ही पात्र असूनही नाव वगळले गेले असेल तर तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी तक्रार करू शकता.

कधी-कधी पुढील Awaas Plus सर्वे सुरू झाल्यानंतर नवीन नोंदणीची संधी मिळते. त्यामुळे ग्रामसभेच्या बैठकीत उपस्थित राहणं देखील महत्त्वाचं ठरते.

घरकुल योजनेची रक्कम आणि हप्ते कसे मिळतात?

अनेक लोकांना असं वाटतं की अर्ज मंजूर झाला की लगेच संपूर्ण पैसे खात्यात येतात. पण प्रत्यक्षात घरकुलाची रक्कम सरकारकडून टप्प्याटप्प्याने हप्त्यांमध्ये दिली जाते.

यामध्ये एक अट असते की घराचं काम कोणत्या टप्प्यापर्यंत झालं आहे हे फोटोद्वारे दाखवावं लागतं. फोटो सरकारी प्रणालीमध्ये अपलोड झाल्यावरच पुढचा हप्ता जमा होतो.

2026 मध्ये घरकुलाचे 4 हप्ते (Installment Details)

घरकुलाचे पैसे साधारणपणे 4 हप्त्यांमध्ये मिळतात.

पहिला हप्ता: घर मंजूर झाल्यावर, पाया खोदण्यापूर्वी – 15,000 रुपये
दुसरा हप्ता: Plinth म्हणजे जोते पूर्ण झाल्यावर – 70,000 रुपये
तिसरा हप्ता: Lintel Level म्हणजे दारे-खिडक्या झाल्यावर – 30,000 रुपये
चौथा हप्ता: घर पूर्ण झाल्यावर आणि प्लास्टर झाल्यावर – 5,000 रुपये

Leave a Comment