मोफत भांडी वाटप योजना : परत अर्ज सुरू , असा भरा फॉर्म

MBOCWWB Household Kitchen Set महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या या कष्टकरी वर्गाला घरातील गरजेच्या वस्तू खरेदी करणे अनेकदा कठीण जाते. हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने “घरगुती वस्तूंचा संच योजना (MBOCWWB Household Kitchen Set)” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या भांडी, टोपल्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा संच मोफत दिला जातो.

ही योजना महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळामार्फत राबवली जाते. विशेष म्हणजे किचन सेट (भांडी योजना) अर्ज लिंक सध्या सुरू आहे, त्यामुळे ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करून घ्यावा, कारण लिंक कोणत्याही वेळी बंद होऊ शकते.

या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे हा आहे. घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू मोफत मिळाल्यामुळे मजुरांना वेगळा खर्च करावा लागत नाही आणि त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार कमी होतो. तसेच आवश्यक वस्तू मिळाल्याने बचतही होते.

किचन सेटमध्ये काय मिळते?

या गृहपयोगी संचाला अनेक जण “किचन सेट” असेही म्हणतात. या किचन सेटमध्ये साधारणपणे 30 प्रकारची वेगवेगळी भांडी असतात. हा संच पूर्णपणे मोफत दिला जातो.

कोण पात्र आहेत?

ही योजना फक्त महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत कामगारांसाठी आहे. पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

कामगाराची BOCW नोंदणी वैध असणे आवश्यक आहे.
अर्ज करताना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
नोंदणी केलेला मोबाईल नंबर चालू असावा.
आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती अचूक भरलेली असावी.

फ्री भांडे वाटप योजना अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस

या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. टप्प्याटप्प्याने प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

1) नोंदणी क्रमांक मिळवा

सर्वात आधी अधिकृत पोर्टल उघडा. तिथे तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि “Proceed to Form” वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकून “Validate OTP” करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल. तो लिहून ठेवा.

2) कामगार वैयक्तिक तपशील भरा

यानंतर “कामगार – वैयक्तिक तपशील” या पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका. क्रमांक टाकल्यानंतर काही माहिती आपोआप भरली जाईल.
पुढे “Select Camp” मध्ये जवळचे शिबिर/केंद्र निवडा आणि “Appointment Date” मध्ये उपलब्ध तारीख निवडा. सुटीच्या दिवशी किंवा फुल्ल स्लॉट असल्यास अपॉइंटमेंट मिळणार नाही.

3) स्वघोषणापत्र अपलोड करा

Self Declaration Form डाउनलोड करा. प्रिंट काढून फॉर्म भरा आणि स्कॅन किंवा स्पष्ट फोटो काढा.
नंतर तो फॉर्म ऑनलाइन अपलोड करा.

4) अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट घ्या

पुढे “PRINT APPOINTMENT” वर क्लिक करा. अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.
दिलेल्या दिवशी निवडलेल्या शिबिरात वेळेत उपस्थित राहा आणि किचन सेट मिळवा.

हे पहिले का – लाडकी बहीण योजनेची नवीन ‘अपात्र’ यादी जाहीर; ‘या’ ५ चुकांमुळे तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो

घरगुती वस्तूंच्या संचात काय-काय मिळते?

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तू जिल्ह्यानुसार थोड्या बदलू शकतात, पण साधारणपणे खालील वस्तू दिल्या जातात.

स्टीलचे भांडे सेट
तांब्याचे किंवा स्टीलचे ताट, वाटी, गिलास
मोठी आणि लहान टोपली
डब्बे, झाकण, करंडी
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तू

महत्त्वाच्या सूचना

अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.
नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे.
अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊनच शिबिरस्थळी जा.
दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहा.

ही योजना का उपयुक्त आहे?

दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत मिळतात.
मजुरांचे खर्च कमी होतात आणि बचत होते.
शासनाकडून थेट मदतीचा लाभ मिळतो.
अर्ज प्रक्रिया मोबाईलवरून सहज करता येते.

घरगुती वस्तूंचा संच योजना ही बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा ठरणारी आहे. जर तुमच्या ओळखीत कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असेल, तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अर्ज करण्यास मदत करा.

Leave a Comment