राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. पण अनेक वेळा या कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण जाते. हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने “घरगुती वस्तूंचा संच योजना (MBOCWWB Household Item Kit)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांडी, टोपल्या आणि इतर काही गरजेच्या वस्तूंचा संच मोफत दिला जातो. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबवली जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम मजुरांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे, त्यांच्या कुटुंबाला आवश्यक घरगुती सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक भारात कमी करणे हा आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू मोफत मिळाल्यामुळे कामगारांना वेगळा खर्च करावा लागत नाही आणि त्यांची बचत होते.
बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) अर्ज अजूनही सुरू आहे
सध्या बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी संच म्हणजेच किचन सेट योजना अर्ज लिंक सुरू आहे. तुम्ही जर अजूनही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून घ्या. कारण ही लिंक कोणत्याही वेळेला बंद होऊ शकते.
या किचन सेटमध्ये साधारण 30 प्रकारची वेगवेगळी भांडी आणि घरगुती वस्तू असतात. हा संच कामगारांना पूर्णपणे मोफत दिला जातो.
MBOCWWB Household Item Kit योजनेसाठी कोण पात्र आहेत?
घरगुती वस्तूंचा संच योजना ही फक्त महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत कामगारांसाठी आहे. लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
कामगाराची BOCW (Building and Other Construction Workers) नोंदणी वैध असणे आवश्यक आहे. अर्ज करताना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबर कार्यरत असावा. आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती अचूक भरलेली असावी.
MBOCWWB Household Item Kit साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. खाली दिल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अर्ज करता येतो.
1) नोंदणी क्रमांक मिळवा
सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. पोर्टल उघडल्यानंतर तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि “Proceed to Form” वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकून “Validate OTP” करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल. तो लिहून ठेवा किंवा कॉपी करून ठेवा.
2) कामगार वैयक्तिक तपशील भरा
नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर पुन्हा अधिकृत पोर्टलवर जाऊन “कामगार – वैयक्तिक तपशील” हे पेज उघडा. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका.
नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुमची काही माहिती आपोआप भरली जाईल. पुढे Select Camp म्हणजे तुमच्या जवळचे शिबिर/केंद्र निवडा आणि Appointment Date म्हणजे उपलब्ध तारीख निवडा. सुटीच्या दिवशी किंवा फुल्ल झालेल्या स्लॉटमध्ये अपॉइंटमेंट मिळणार नाही.
3) स्वघोषणापत्र अपलोड करा
Self Declaration Form डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. आवश्यक तपशील भरून त्या फॉर्मचा स्कॅन करा किंवा मोबाईलने स्पष्ट फोटो काढा.
त्यानंतर हा स्वघोषणापत्राचा फोटो/फाइल ऑनलाइन फॉर्ममध्ये अपलोड करा.
4) अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट घ्या
पुढे “PRINT APPOINTMENT” वर क्लिक करा. दिलेल्या तारखेची अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.
निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात वेळेत उपस्थित राहा आणि तुमचा घरगुती वस्तूंचा संच प्राप्त करा.
घरगुती वस्तूंच्या संचात काय-काय मिळते?
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तूंची यादी जिल्ह्यानुसार थोडी बदलू शकते. पण साधारणपणे खालील वस्तू मिळतात.
स्टीलचे भांडे सेट
ताट, वाटी, गिलास (स्टील/तांबे)
मोठी आणि लहान टोपली
डब्बे, झाकण, करंडी
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तू
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा. नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक योग्य असणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊनच शिबिरस्थळी जा. दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहा
ही योजना का उपयुक्त आहे?
दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत मिळतात. कामगारांचे खर्च कमी होतात आणि बचत होते. शासनाकडून थेट मदतीचा लाभ मिळतो. अर्ज प्रक्रिया सोपी असल्यामुळे मोबाईलवरूनही ऑनलाईन अर्ज करता येतो.
घरगुती वस्तूंचा संच योजना ही बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी योजना आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या कष्टाचा सन्मान देखील आहे. तुमच्या ओळखीतील कोणीतरी बांधकाम कामगार असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अर्ज करण्यास मदत करा.
जर तुम्हाला अर्ज करताना अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण अधिकारी किंवा शिबिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
हे पहा – विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सर्व शाळांना 4 दिवसांची सुट्टी जाहीर