महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. मात्र आता या योजनेबाबत एक मोठं अपडेट समोर येत आहे. अनेक महिलांनी Ladki Bahin Yojana e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरीही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे— “e-KYC झालं तरी माझ्या खात्यात पैसे का येत नाहीत?” तर याचं कारण फक्त KYC नसून, काही महत्वाच्या पात्रता अटी आणि बँकिंग प्रक्रियेशी संबंधित समस्या असू शकतात.
e-KYC (e-KYC) नंतरही लाभ का मिळणार नाही?
लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलवर e-KYC अनिवार्य केली होती आणि यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती.
मात्र e-KYC पूर्ण असली तरी खालील कारणांमुळे तुमचा लाभ थांबू शकतो👇
1) उत्पन्नाची अट (Income Limit)
जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त असेल, तर e-KYC झालं तरी तुम्ही अपात्र ठरू शकता.
2) आधार लिंकिंग / DBT Active नाही (Aadhaar Seeding)
जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल किंवा DBT (Direct Benefit Transfer) Active नसेल, तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत.
3) चुकीची माहिती / तफावत (Mismatch Details)
अर्जात दिलेली माहिती आणि e-KYC मधील माहितीमध्ये फरक आढळल्यास तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
ही अपडेट पहा : सोन्याच्या दरात जोरदार उडी! आजचा 24K-22K Gold Rate पाहा
कोणाला मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता?
जर तुम्ही खालील निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला या योजनेतून वगळले जाऊ शकते👇
✅ कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत किंवा पेन्शन घेतात
✅ कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे
✅ ज्या महिलांनी अजून e-KYC पूर्ण केलेली नाही
सध्या अनेक रिपोर्टनुसार 1 कोटी 60 लाख महिलांनी e-KYC पूर्ण केली असून अजूनही 30 ते 40 लाख महिलांचं KYC प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांचा लाभ थांबण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana पात्रता काय आहे?
लाडकी बहीण योजना लाभासाठी महिलांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतात👇
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
- विवाहित / विधवा / घटस्फोटित / परित्यक्त / निराधार महिला पात्र
- कुटुंबाचे उत्पन्न ₹2.50 लाखांच्या आत असावे
- केशरी/पिवळे रेशन कार्ड असल्यास अनेक वेळा उत्पन्न दाखल्याची गरज लागत नाही
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमितपणे घ्यायचा असेल, तर खालील 3 गोष्टी नक्की तपासा👇
✅ तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का?
✅ DBT Active आहे का?
✅ अर्जातील सर्व माहिती अचूक आणि पात्रतेनुसार आहे का?