Gold rate Mumbai : जगभरातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-इराणमधील वाढता तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत. परिणामी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतोय. याचाच परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
Gold rate Mumbai : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,160 रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,160 रुपये प्रति तोळा इतका आहे. सामान्यतः 24 कॅरेट सोन्याची खरेदी गुंतवणूक म्हणून केली जाते, तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा वापर दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
Gold rate Mumbai
देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,010 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,010 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे.
याशिवाय अहमदाबाद, जयपूर, भोपाळ, लखनौ आणि चंदीगड या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,160 रुपये प्रति तोळा, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,160 रुपये प्रति तोळा इतका आहे.
तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव कायम आहे, तोपर्यंत सोन्याच्या दरात वाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
हे वाचा – या लोकांना HSRP नंबरप्लेट ची ची गरज नाही जाणून घ्या नवीन नियम
सोन्याचा दर कसा ठरतो? जाणून घ्या महत्वाची कारणं
सोने आणि चांदीचे दर दररोज बदलतात. या दरामागे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अनेक घटक जबाबदार असतात.
1) डॉलर-रुपया विनिमय दराचा प्रभाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरतात. त्यामुळे डॉलर मजबूत झाला, तर रुपया कमजोर होतो आणि भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढतात.
2) आयात शुल्क, GST आणि स्थानिक कर
भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. त्यामुळे आयात शुल्क, GST आणि स्थानिक कर यामध्ये बदल झाला तर सोन्याचे दर थेट वर-खाली होतात.
3) युद्ध, जागतिक तणाव आणि मंदीचा परिणाम
जगभरात युद्धस्थिती, भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी किंवा व्याजदरातील बदल झाले तर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असते. कारण अशा परिस्थितीत लोक शेअर मार्केटऐवजी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात.
4) सण-लग्नसराईत मागणी वाढते
भारतामध्ये सोन्याला आर्थिक गुंतवणूकसोबतच सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. सण, लग्नसराई आणि शुभकार्यांमध्ये सोन्याची मागणी वाढते आणि त्यामुळे दरांवर परिणाम होतो.
5) महागाईमध्ये सोनं ‘Safe Option’
महागाई वाढली किंवा बाजार अस्थिर झाला, तर सोनं दीर्घकाळापासून सुरक्षित पर्याय मानलं जातं. म्हणूनच अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या किंमती वाढताना दिसतात.