लाडकी बहीण योजना: KYC असूनही पैसे आले नाहीत? यामागचे 3 मोठे कारण

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. काही महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. “माझ्या खात्यात पैसे का आले नाहीत?”, “माझं नाव यादीतून काढलं का?”, “हप्ता पुन्हा मिळेल का?” असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात येत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना सरसकट मिळाला नाही. काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. यामागे काही ठराविक कारणं असू शकतात.

या महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले नाहीत

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी KYC करणे अनिवार्य करण्यात आले होते. शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले होते की, KYC पूर्ण न केल्यास पुढे हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप KYC केलेली नाही, अशा काही महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही.

याआधी असे सांगण्यात आले होते की नवीन आर्थिक वर्षापासून KYC नसलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाईल. मात्र काही महिलांना आतापासूनच पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यात गोंधळ वाढला आहे.

KYC केलेली असतानाही काही महिलांना पैसे का मिळाले नाहीत?

फक्त KYC केल्यानेच सर्व महिलांना लाभ मिळेल असे नाही. योजना सुरू असताना शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. या निकषांमध्ये जे पात्र असतील त्यांनाच लाभ दिला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खालील कारणांमुळे काही महिलांचा हप्ता थांबला असू शकतो.

1) कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे

योजनेनुसार जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर अशा महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो.

2) वयोमर्यादेत न बसणे

योजनेत महिलांसाठी ठराविक वयोमर्यादा लागू आहे. त्या मर्यादेत न बसणाऱ्या महिलांचा लाभ देखील बंद केला जाऊ शकतो.

3) KYC अपूर्ण किंवा चुकीची माहिती

काही महिलांनी KYC केली असली तरी बँक खात्याशी आधार लिंक नसणे, चुकीचा मोबाईल नंबर, नावात फरक किंवा इतर तपशीलात चूक असल्यामुळे पेमेंट अडकू शकते.

पुढे काय करावे?

जर तुमच्या खात्यात डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता आला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वात आधी खालील गोष्टी तपासा.

बँक खात्याची KYC पूर्ण आहे का हे तपासा
आधार-बँक लिंक आहे का ते पाहा
अर्जामध्ये दिलेली माहिती बरोबर आहे का ते तपासा
योजना पोर्टलवर स्टेटस चेक करा किंवा जवळच्या सेवा केंद्रावर विचारणा करा

लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता अनेक महिलांना मिळाला आहे, पण काही महिलांना तो मिळालेला नाही. यामागे KYC अपूर्ण असणे, उत्पन्न मर्यादा, वयोमर्यादा किंवा काही तांत्रिक कारणे ही मुख्य कारणे असू शकतात. त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी घाबरून न जाता आपली माहिती एकदा तपासून घ्यावी.

हे वाचा – सरकार देत आहे मोफत 300 रुपयांना गॅस सिलेंडर अर्ज झाले सुरू असा करा अर्ज | gas cylinder

Leave a Comment