दहावी-बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर ; कोणत्या दिवशी कुठला पेपर आत्ताच पाहून घ्या

10th Board Exam Timetable 2026 विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा आणि तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहेत.

विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा टाइम टेबल मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वरून संपूर्ण वेळापत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करता येईल.

परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बोर्ड परीक्षा दररोज दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिलं सत्र सकाळी 11 वाजता सुरू होऊन दुपारी 2:10 पर्यंत चालेल. तर दुसरं सत्र दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:10 या वेळेत होईल.

विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या वेळेचे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. तसेच विषयानुसार दिलेल्या तारखा लक्षात घेऊन परीक्षा तयारीचे नियोजन करणे विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचे ठरेल.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आणि परीक्षा नियमानुसार तयारी करण्यासाठी मदत करेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक एकदा नीट पाहून, कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे, कोणते सत्र आहे, आणि परीक्षा वेळ काय आहे, हे आधीच नोंद करून ठेवणे फायदेशीर ठरेल.

हे पहिले का : घरकुल यादी 2026 : तुमचेनाव यादीत आले का? असे चेक करा

Leave a Comment