Maharashtra Civic Polls Result 2026 : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. निकालाचे आकडे समोर येण्याआधीच राज्यात महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. राज्यभरातून तब्बल ६९ उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध यशामध्ये भाजपला सर्वाधिक फायदा झाल्याचं चित्र दिसत आहे.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडून आलेल्या ६९ उमेदवारांना विजय प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा (KDMC) वाटा सर्वाधिक आहे. KDMCमध्ये भाजपचे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
याशिवाय,
- जळगावमध्ये १२
- पनवेलमध्ये ८
- शिंदेंच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात ७
- भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि धुळे या शहरांमध्येही भाजपने आपले खाते उघडले आहे. मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे.
भाजपचे बिनविरोध उमेदवार (यादी)
पुणे महानगरपालिका
- प्रभाग १६ अ – डॉ. वीरेन खडके
- प्रभाग १३ क – वैशाली पाटील
- प्रभाग ७ ब – अंकिता पाटील
- प्रभाग १२ ब – उज्ज्वला बेंडाळे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- प्रभाग ३५ – मंजुषा नागपुरे
- प्रभाग ३५ ड – श्रीकांत जगताप
- प्रभाग ६ ब – रवी लांडगे
- प्रभाग १० ब – सुप्रिया चांदगुडे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
- प्रभाग २४ अ – रमेश म्हात्रे
- प्रभाग २४ ब – विश्वनाथ राणे
- प्रभाग २४ क – वृषाली जोशी
- प्रभाग २८ अ – हर्षल राजेश मोरे
- प्रभाग ११ अ – रेश्मा निचळ
- प्रभाग २८ ब – ज्योती मराठे
ठाणे महानगरपालिका
- प्रभाग १८ ब – जयश्री फाटक
- प्रभाग १८ क – सुखदा मोरे
- प्रभाग १७ अ – एकता भोईर
- प्रभाग १८ ड – राम रेपाळे
- प्रभाग १४ अ – शीतल ढमाले
- प्रभाग ५ ब – जयश्री डेव्हिड
- प्रभाग ५ अ – सुलेखा चव्हाण
जळगाव महानगरपालिका
- प्रतिभा देशमुख
- विक्रम सोनवणे
- मनोज चौधरी
- रेखा पाटील
- सागर सोनवणे
- गौरव सोनवणे
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगरमध्ये 2 ठिकाणी यश
- कुमार वाकळे
- प्रकाश भागानगरे
हे वाचा – महिला/पुरुष दोघांसाठी संधी, कोण पात्र? किती फी? अर्ज कुठे करायचा?