अहिल्यानगर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. बाल विकास प्रकल्प अहिल्यानगर (Integrated Child Development Services Scheme Project – ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper / Madatnis) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये एकूण 01 रिक्त जागा जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ही भरती अहिल्यानगर (संगमनेर नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र) साठी आहे.
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026
भरतीचे नाव
Ahilyanagar Anganwadi Bharti 2026
संस्था / विभाग
Bal Vikas Prakalp Ahilyanagar (ICDS Project)
पदाचे नाव
Anganwadi Helper (Madatnis) / अंगणवाडी मदतनीस
एकूण पदसंख्या
01 जागा
नोकरी ठिकाण
Ahilyanagar (संगमनेर नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र)
अर्ज पद्धत
Offline (ऑफलाईन)
अधिकृत वेबसाईट
https://ahilyanagar.maharashtra.gov.in/
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
विशेष बाब म्हणजे विधवा उमेदवारांसाठी कमाल वय 40 वर्षे आहे.
वेतन / मानधन
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 7,500 रुपये मानधन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा
ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख
27 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
09 फेब्रुवारी 2026 (शासकीय सुट्ट्या दिवस वगळून)
अर्ज सादर करण्याचा पत्ता
Child Development Project Officer Urban,
Ahilyanagar West, Vedanta Colony, 1st Floor,
Old Dr. Satalkar Hospital Neighbor,
Bagroja Hudco, Delhi Gate,
Ahilyanagar – 4140001
मराठीत पत्ता
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पश्चिम,
वेदांत कॉलनी, पहिला मजला,
डॉ. साताळकर हॉस्पिटल शेजारी, वागरोजा हडको,
दिल्ली गेट, अहिल्यानगर – 4140001
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीची जाहिरात PDF डाउनलोड करा.
- जाहिरातीतील सर्व अटी आणि पात्रता नीट वाचा.
- अर्जाचा नमुना मिळवून त्यातील माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा.
- अर्ज पूर्ण करून दिलेल्या पत्त्यावर वेळेत जमा करा / पाठवा.
- अर्ज सादर केल्यानंतर पावती किंवा रिसिव्हिंग नक्की घ्या.
महत्वाची सूचना
ही भरती ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्ज शेवटच्या दिवशी उशीर होऊ नये याची काळजी घ्या. तसेच अर्ज पाठवण्याआधी सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य आहेत का, ते तपासून घ्या.
दहावी आणि बारावी नवीन वेळापत्रक जाहीर येथे पहा | ssc hsc exam date