10th Hall Ticket 2026 फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावीच्या (SSC) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्वात जास्त प्रश्न पडतो तो म्हणजे “हॉल तिकीट कधी मिळणार?” कारण परीक्षेच्या आधी हॉल तिकीट मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचे असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीच्या परीक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार SSC 10th Hall Ticket 2026 हे 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही प्रवेशपत्रे शाळांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करायची आहेत.
दहावीची हॉल तिकीटं कोणत्या तारखेला मिळणार?
दहावीच्या परीक्षेसाठीची हॉल तिकीटं 20 जानेवारी 2026 (मंगळवार) पासून उपलब्ध होणार आहेत.
हे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने शाळांना उपलब्ध करून दिले जातील आणि शाळांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे.
हॉल तिकीट कुठे आणि कशी मिळणार?
विद्यार्थ्यांना हॉल तिकीट स्वतः वेबसाइटवरून काढता येणार नाही. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर देण्यात आली आहे.
शाळांनी खालील अधिकृत वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे.
हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देण्यात येईल. प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
हॉल तिकीटासाठी पैसे भरावे लागतील का?
नाही. हॉल तिकीट छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांकडून “प्रिंटिंग चार्ज” किंवा इतर कोणतेही पैसे घेता येणार नाहीत.
कोणत्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार?
महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, अशाच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध होईल. जर एखाद्या विद्यार्थ्याने अजून परीक्षा शुल्क भरले नसेल तर शुल्क भरल्यानंतरच हॉल तिकीट दिले जाईल.
हे राहिले- मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये अनुदान! लगेच अर्ज करा
SSC 10th Exam Date 2026: दहावीची परीक्षा कधी आहे?
दहावीची मुख्य लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे.
तर प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत.
10 वीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक
20 फेब्रुवारी 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)
दुपारी 3 ते सायंकाळी 6: दुसरी/तिसरी भाषा (जर्मन, फ्रेंच)
21 फेब्रुवारी 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: विविध व्यावसायिक/तांत्रिक विषय
23 फेब्रुवारी 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: दुसरी/तिसरी भाषा
सकाळी 11 ते दुपारी 2: दुसरी/तिसरी भाषा संयुक्त अभ्यासक्रम
25 फेब्रुवारी 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: दुसरी/तिसरी भाषा
दुपारी 3 ते सायंकाळी 5: दुसरी/तिसरी भाषा संयुक्त अभ्यासक्रम
27 फेब्रुवारी 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: इंग्रजी
4 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 2: हिंदी
सकाळी 11 ते दुपारी 1: संयुक्त अभ्यासक्रम
6 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: गणित भाग-1 (बीजगणित)
अंकगणित (पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी)
9 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: गणित भाग-2 (भूमिती)
11 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
सकाळी 11 ते दुपारी 1:30: शारीरिकशास्त्र आणि स्वच्छता (दिव्यांगांसाठी)
13 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
16 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: सामाजिक विज्ञान पेपर-1 (इतिहास आणि राज्यशास्त्र)
18 मार्च 2026
सकाळी 11 ते दुपारी 1: सामाजिक विज्ञान पेपर-2 (भूगोल)
महत्वाचे लक्षात ठेवा
हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्यावर तुमचे नाव, आई-वडिलांचे नाव, विषय, परीक्षा केंद्र आणि सीट नंबर याची योग्य तपासणी करा. काही चूक दिसल्यास लगेच तुमच्या शाळेला माहिती द्या.